Today Nifty Index Date 14/05/2025
नमस्कार आज दिनांक 14/05/2025 सकाळी 09:15 वाजता मार्केट स्टार्ट केल्यानंतर 09:30 पर्यंत पंधरा मिनिटं पूर्ण झाल्यानंतर पुन्हा माझ्या सेट अपना CE साईडला मला कॉल दिला त्यानुसार मी CE चा कॉल घेतला आणि त्यातील प्रॉफिट मी तुमच्यासमोर देत आहे.
पहिल्यांदा मी असा विचार केला की आता सेटअप CE साईडला बनतो आहे तर लगेच मी CE घेतला पण थोडंसं खालवर होताच मी त्याच्यामध्ये थोडंसं डिप्रेशन मध्ये येऊन किंवा भीती आल्यानंतर मी तो दिला पुन्हा तो त्या रेंजमध्ये Range Bound झाल्यामुळे मला पुन्हा वाटलं की त्याच्यामध्येही पुन्हा BUY करू शकतो तीच लेवल साधून तोच दर साधून मी ते दोन एंट्री केली.अपेक्षेप्रमाणे ज्या दरापर्यंत जाणे अपेक्षित होते त्या दरापर्यंत काही गेला नाही म्हणुन पुन्हा मी होते त्याच दरावरती बाहेर पडलो त्यानंतर मला जे एक्स्पेक्टेड Higher होता तो त्याने लावल्यानंतर मला पुन्हा वाटले की नाही आता याच्यामध्ये पुन्हा CE घ्यायला पाहिजे किंवा याच्यामध्ये थोडासा वेट करू शकतो म्हणून मी पुन्हा तिसऱ्यांदा त्या वाढीव दरावरती मी त्याला BUY केलं आणि तिथून पुढे वेट करून मी थोडसं प्रॉफिट मध्ये आल्यानंतर आजच्या दिवसाचे मी ट्रेडिंग स्टेशनला स्टॉप केलेला आहे.
कारण का काल दिनांक 13/05/2025 रोजी सकाळी मला भरपूर प्रमाणात प्रॉफिट झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की मी त्यानंतर साडेअकरा साडेबारा नंतर काही ट्रेंड्स चुकीचे झाले आणि त्याच्यामध्ये माझा झालेला प्रॉफिट जाऊन मी अडीच हजार लॉस मध्ये गेलो होतो पुन्हा मी तो बऱ्यापैकी कव्हर करत आणून तो फक्त आठशे रुपये पर्यंत ठेवला आणि कालच्या दिवसाची सांगता केली मग त्यामुळे कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस बरा मानून किंवा आपण आलेला प्रॉफिट घेऊन शांत बसलेल चांगलं असे मला वाटते म्हणून मी आजच्या दिवसाचे ट्रेडिंग थांबवत आहे आणि झालेला प्रॉफिट मी तुमच्यासाठी शेअर करत आहे.

Comments
Post a Comment